पंतप्रधान मोदीजींमुळे देशाचा कायापालट – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
महेश बारटक्के – प्रतिनिधी
कुडाळ ता.24 – देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सामान्य व्यक्ती केंद्रबिंदू मानून विविध लोकोपयोगी योजना राबवल्या असून त्याचा थेट लाभ खेडोपाड्यातील गोरगरीब जनतेला होत आहे. राष्ट्रीय जलजीवन मिशन मुळे पिण्याचे पाणी प्रत्येकाच्या घरात मुबलक प्रमाणात मिळत आहे. शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रूपये थेट बँक खात्यात जमा होत आहेत, पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, जनधन योजना, ई-श्रम कार्ड आदीच्या माध्यमातून लाखो लोकांना थेट लाभ मिळत असून पंतप्रधान मोदीजींमुळे देशाचा कायापालट झाला आहे, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बोलताना व्यक्त केले.
कुडाळ ता. जावली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जावळी तालुका भाजपच्यावतीने सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराच्या उदघाट्नप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे, युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्निल ननावरे, अल्पसंख्यांक मोर्चाचे समीर आतार, संदीप परामणे, जिल्हा चिटणीस सयाजी शिंदे, माजी उपसभापती रविंद्र परामणे, बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे, भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष गीता लोखंडे ,भाजप तालुका सरचिटणीस किरण भिलारे, कुडाळचे माजी सरपंच विरेंद्र शिंदे, महेश देशमुख, महिला उपाध्यक्ष सोनिया धनावडे, कविता धनावडे, युवती अध्यक्ष मोनिका परामने, रोहित नवसरे, मेढा शहराध्यक्ष विनोद वेंदे, चंदू क्षीरसागर, विठ्ठल देशपांडे, नगरसेवक विकास देशपांडे, गणेश पवार, प्रशांत मोरे, अजय शिर्के, विकास धोंडे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.
यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा पंधरवड्याचे आयोजन केले असून त्यानिमित्त जावली तालुक्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. पंतप्रधान मोदीजींच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्य लोकनाची उन्नती होत आहे. पक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. पक्षाने तसेच आमदार भोसले यांनी टाकलेली सर्व प्रकारची जबाबदारी पदाधिकारी म्हणून यशस्वीपणे पार पाडू, असेही त्यांनी सांगितले. तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर स्वप्निल ननावरे यांनी आभार मानले.